इतर
रामदेवबाबांवर
रामदेवबाबांवर
विनयभंगाचा गुन्हा
दाखल करा:तृप्ती देसाई

मुंबई : महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे योगगुरू
रामदेव बाबा यांच्या वर सुमोटो अॅक्शन घेत महिला
आयोग, सरकार आणि पोलिसांनी विनयभंगाचा
गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या
संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे.
तर उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी
त्यावेळीच त्यांचा निषेध करायला हवा होता, अशी
प्रतिक्रिया विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम
गोऱ्हे यांनी दिली.