पत्नीला रक्ताचे थारोळ्यात टाकून घराला कुलूप लावून पती पसार!

अकोले /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथे संशयाच्या कारणावरूनआपल्या पत्नीचा धारदार हत्याराने खून केल्याचा धकादायक प्रकार उघडकीस आला
. आरोपी पती ने पत्नीचा खून करून मृतदेह तसाच रक्ताच्या थारोळ्यात “ठेऊन घराला कुलूप लावून पसार झाला. जेव्हा त्यांच्यामुलाने दुसऱ्या दिवशी घराचे कुलूप उघडले तेव्हा हा तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघकीस आला. यात रंजना जगन्नाथ आडे (वय ४२, रा.शेल विहिरे) या महिलेचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन राजूर पोलिसांनी आरोपी जगन्नाथ भागा आडे (रा.शेलविहिरे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे., फिर्यादी मयत रंजना च मुलगा जालिंदर आडे (वय २६) हा गुरुवारी (दि. १९) मे रोजी कामासाठी बाहेर निघाला असता आई वडिलांमध्ये भांडण चालू होते. त्यावेळी जालिंदरने दोघांना समजावून सांगितले. तोकामासाठी घराबाहेर पडला. रात्री ८ वाजता घरी तो घरी आला असता घराला कुलूप दिसले तेव्हा त्याला वाटले आई-वडील कोठेबाहेर गेले असतील, असा विचार करून जालिंदर आपल्या मावस भावाकडे डोंगरवाडी येथे गेला. त्यानंतर जालिंदर याने वारंवारफोन करून देखील आईकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आई- वडिलांची भांडणाची पार्श्वभूमीपाहता मुलाला संशय आल्यामुळे मावस भावाला घेऊन तो शेलविहिरे येथे आला तेव्हा देखील घराला कुलूप लावलेले होते. त्यामुळे त्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याला आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसला. आईचा मृतदेहपाहून त्याला धक्का बसला. वडिलांचेसकाळी आईबरोबर सुरु असलेले भांडण पाहता मुलाला वडिलांचा संशय आल्याने त्याने देवगाव येथून मामाला घेऊन पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला.
दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविला.
याप्रकरणी आरोपी जगन्नाथ भागा आडे (रा. शेलविहिरे ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सा. पो. नि नरेंद्र साबळे यांचे मार्गदर्शन खाली चालू आहे.———