इतरमहाराष्ट्र

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सकारात्मक चर्चा नंतर बेमुदत उपोषण स्थगित!

रायगड दि २७

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न – भारतीय मजदुर संघ ) महावितरण वाशी मंडळ तर्फे विविध मागण्या संदर्भात पनवेल खांदा कॉलनी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर दिनांक २८/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.मात्र दुपारी १२:३० ते २:३० दरम्यान कामगार उपआयुक्त विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, खांदा कॉलनी, पनवेल रायगड या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी,महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी, महावितरणचे कंत्राटी कामगार, ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली

.यात विविध विषयावर चर्चा झाली.या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी, वाशी विभागाचे मॅनेजर जयश्री मराडे, पनवेल एमएसईबी डेप्युटी मॅनेजर सचिन घोडेकर, मे. ऑल ग्लोबल सर्विस प्रा. ली. या एजेन्सीचे प्रतिनिधी प्रशांत देठे, रोहित परब, नरेश मखीजा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश अणेराव,रायगड जिल्हा सचिव कमाल खान, पनवेल सिटी कोषाध्यक्ष कल्पेश म्हात्रे, कामगार बाळकृष्ण ठाकूर, खांदेश्वर गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी सलीम तळवी आदी उपस्थित होते.कामगारांच्या विविध समस्या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांनी ठेकेदारांना व ठेकेदार प्रतिनिधीना विविध सूचना केल्या. कामगारांच्या समस्या त्वरित सोडविण्याचे सूचना शीतल कुलकर्णी यांनी ठेकेदारांना (प्रतिनिधिंना )केले.सचिन मेंगाळे, उमेश अनेराव यांनी कामगारांच्या विविध समस्यावर उत्तमपणे, भक्कमपणे बाजू मांडली. यावेळी प्रत्येक समस्यावर उपाययोजना शीतल कुलकर्णी यांनी सुचविले व त्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश ठेकेदार व ठेकेदारांचे प्रतिनिधिंना केले.यावेळी ठेकेदारांनी सर्व सूचनांचे पालन केले जाईल असे आश्वासन दिले. तसे त्यांनी मिटिंग मध्ये झालेल्या विषयावर, उपाययोजनावर सही सुद्धा केली आहे. कामगारांना यापुढे कोणताही त्रास होणार नाही अशी हमी ठेकेदारांनी दिली.विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याने सदर बेमुदत उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.वाशी मंडळ अंतर्गत ५१२ कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी सदर उपोषण स्थळी १५० कंत्राटी कामगार उपस्थित होते.
राजस्थान, हरियाणा, आडिसा सरकार ने कंत्राटदार हटवून कंत्राटी कामगारांना रोजगारात स्थैर्य , हमी दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार ने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या(कामगारांच्या प्रमुख मागण्या
):-

१) मे. ऑल ग्लोबल सर्व्हिस प्रा. ली. या एजन्सीचे लायसन्स रद्द करून सदर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे.

२) दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी

३) न्यायालयीन संरक्षित कामगारांना पुन्हा त्वरित कामावर घेण्यात यावे.

४) अशोक अखाडे ठेकेदारचे सुरक्षा ठेव मधुन महावितरण ने कामगारांचे राहिलेले थकीत वेतन व बोनस देणे.

५) जय दत्त एजंसीचे सुरक्षा ठेव मधुन महावितरण ने कामगारांचे राहिलेले पगार व फरक देणे

६) अपघात झालेल्या कामगारांचे व त्यांचे परिवारांचे त्वरित मेडिकल भरपाई व पेन्शन लागु करणे.

७) सर्व कंत्राटी कामगारांचे एकाच दिवशी पगार झाले पाहिजे.

८) परिपत्रक ५३६ एम एम आरडीए झोन चे पालन करून समान काम समान वेतन व बोनस परिपत्रक ची अंमलबजावणी करणे.
या बाबतीत शासनाने प्रशासनाने दखल न घेतल्यास दि 21 डिसेंबर 2022 रोजी मंत्रालय मुंबई येथे भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे अशी घोषणा सचिन मेंगाळे महामंत्री (महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ ) यांनी मार्गदर्शन करताना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button