कोरठन येथे परंपरेप्रमाणे चंपाषष्टी महोत्सव भक्ती भावाने संपन्न

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, ता पारनेर,जि. अहमदनगर या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रवर २५ व्या वर्षाचा रौप्य चंपाषष्टी उत्सव महोत्सव मोठया धार्मिक व भक्ती भावाने संपन्न झाला.

पहाटे ५ वा श्री राहुल व सौ अनिता खिलारी टाकळी ढोकेश्वर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. याप्रसंगी मा. अध्यक्ष ॲड.पांडुरंग गायकवाड उपस्थित होते. स. ६ वा. ज्ञानदेव लंके व शकुंतला लंके यांच्या शुभ हस्ते अभिषेक पूजा पार पडली .याप्रसंगी उपाध्यक्ष महेश शिरोळे, मा सरपंच अशोक घुले ,कमलेश घुले, रवींद्र जगताप, भरत घुले सरचिटणीस जालिंदर खोसे उपस्थित होते. अभिषेक महापूजा झाल्यानंतर भाविकांना खंडोबाचे दर्शन खुले झाले, यावेळी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.सकाळी दहा वाजता कृष्ण कृपांकित भागवताचार्य मिसाळ महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी महाराजांचा भक्त वर्ग मोठ्या संख्येने हजर होता. दु.१ वा
करवीर पिठाचे शंकराचार्य यांचे आगमन झाले. त्यांचा सत्संग व दर्शन सोहळा पार पडला. शंकराचार्यांनी आपल्या प्रवचनांमधून कर्म निष्काम भावनेने केल्यानंतर अत्यंत सुख प्राप्त होते,हिंदू धर्म व संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ते पुढे म्हणाले की थोरा मोठ्याच्या वचनापेक्षा शास्त्र वचन हे महत्त्वाचे आहे. दु.२ वाजता खंडोबा चांदीची पालखी व चांदीच्या उत्सव मूर्ती नवीन शाही रथातून मंदिर प्रदक्षिणा मिरवणुकीने मुख्य कार्यक्रम ठिकाणी आगमनित झाली. त्यानंतर महाराजांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.
यावेळी खंडोबा भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 ते 11 सुश्राव्य संगीत भजन कार्यक्रम श्री दिगंबर राऊत सर, श्री नंदकिशोर घुले ,राजेंद्र सूर्यवंशी, श्री केशव महाराज यांचा संगीत भजन व गायन कार्यक्रम चालू होता.
यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा सौ शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, खजिनदार तुकाराम जगताप, सचिव जालिंदर खोसे, सरचिटणीस कमलेश घुले,मा. अध्यक्ष ॲड.पांडुरंग गायकवाड,मा सरपंच अशोक घुले,विश्वस्त रामदास मुळे,धोंडीभाऊ जगताप, राजेंद्र चौधरी, महादेव पुंडे,दिलीप घुले व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी,दर्शन व्यवस्था व पार्किंग यांचे योग्य नियोजन केले होते.
