शिव पानंदचे आंदोलन तात्पुरते स्थगित- महसुलमंत्री यांच्या कार्यालयामध्ये २४ एप्रिलला बैठक

दत्ता ठुबे
पारनेर:- महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतरस्त्यांच्या प्रश्नांवर आझाद मैदानावर दि.२१,२२ एप्रिलला राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या धरणे व जलत्याग आंदोलन तात्पुरते स्तगीत केले असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे नेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी सांगितले
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामध्ये शिव पाणंद चळवळीच्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावरील मागण्याच्या संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची दि.२४ एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली असुन यासदर्भात महसुलचा स्वतंत्र शासन निर्णय बनवण्यासंदर्भात चळवळीच्या वतीने सरकारला सकारात्मक प्रतिसाद देत आझाद मैदानावरील राज्यव्यापी आंदोलन तात्पुरते स्थगित करून सरकारशी चर्चा करून आपल्या मागण्या शासननिर्णयात घेण्यासाठी आम्ही आग्रही राहू शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी आग्रही राहून शिव पाणंद शेतरस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, वहिवाटीचे रस्ते आदी नकाशावरील शेतरस्त्यांसह तहसिल प्रांत कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस यासंदर्भात विशेष कालावधी मुदत जाहीर करून शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती, नकाशावर लांबी रुंदी, दगड नंबरी, शेतरस्ता नंबरींग, ग्रामशेतरस्ता समिती स्थापना, यांसह मोजणी शुल्क संरक्षण फी संदर्भात विशेष निर्णय आदी मागण्या शासननिर्णयात घेण्यात चळवळ आग्रही राहील.

राज्यभरातील तमाम शेतकरी बांधव, वृत्त पत्र इले. मिडीयातील पत्रकार बांधवांनी दिलेल्या पाठबळामुळे आज सरकारने सकारात्मक भुमिका घेतली असुन महसुलचे मुख्य सचिव प्रविण महाजन, विशेष कार्य अधिकारी सचिन ढोले, महसुलचे राहूल गांगुर्डे यांनी शेतकऱ्यांची भावना व पिढ्यान् पिढ्या चाललेला संघर्ष पाहून शिव पाणंद शेतरस्ता चळवळीला प्रतिसाद देवून दुरध्नीवरून संपर्क साधत महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाची भुमिका घेत तातडीने पत्र देत मुंबई येथिल महसुल कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठीक घेवून परिपूर्ण शासन निर्णय बनवून शेतकऱ्यांना सरकार दर्जेदार शेतरस्ते देण्यासाठी बांधील राहील असे आश्वासन दिले.