श्री सिध्दरामेश्वरांची गड्डा यात्रा चे औचित्य साधत नंदीध्वज’ प्रात्यक्षिके

.
विद्यार्थ्यांना ‘नंदीध्वजाचे’ तयार करण्याचे प्रशिक्षण
सोलापूर : अख्खा महाराष्ट्रात लौकीक आणि अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या श्री सिध्दरामेश्वरांची गड्डा यात्रा व धार्मिक कार्यक्रम लवकरच होणार आहे, याचे औचित्य साधून सोलापूरातील पद्मशाली सखी संघम आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट रोड वरील एमआयडीसीच्या भागातील सुनील नगर येथील अरुण प्राथमिक शाळा व कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला, इतर शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नंदीध्वज तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. यामुळे हजारो ‘डोळे’ आनंदीत झाले.
सोमवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमांत पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, उपाध्यक्षा जमुना इंदापूरे, सहसचिवा ममता तलकोकूल, सदस्या पल्लवी संगा, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल, शाळेचे संस्थापक शंकर चौगुले, सचिव विजयकुमार चौगुले, मुख्याध्यापक राचप्पा मिराकोर, मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू, सेवासदन शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उषा हंचाटे यांच्यासह ‘ऑल इज वेल’चे संस्थापक अध्यक्ष सुरेश येमूल यांनी नंदीध्वज तयार करण्यासाठी विस्तृत माहिती देऊन प्रात्यक्षिक करुन दाखवले. नंदीध्वजांचे प्रात्यक्षिके दाखवताना विद्यार्थी अचंबित होत पाहत राहिले.
प्रारंभी सरस्वतीदेवी प्रतिमेचे पूजन करुन मुख्य कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्षा ममता मुदगुंडी यांनी केल्या, फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी श्री सिध्दरामेश्वरांची गड्डा यात्रा, धार्मिक कार्यक्रम व नंदीध्वज बाबत उपस्थितांना माहिती विषद केली. आभार मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू यांनी मानल्या. नितीन दणाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून नंदीध्वजाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी व पालकांची संख्या लक्षणीय होते.

————————