
विजय खंडागळे
सोनई -लांडेवाडी रोडवरील लिपाने -घावटे वस्ती वर गेल्या तीन दिवसापासून तेथील नागरिकांना अचानकपणे बिबट्याने दर्शन दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लांडेवाडी रोडवरील घावटे- लिपाने वस्ती असून त्या भागात पाणी चारा,लपण्यासाठी उसाचे पीक मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या त्याचाच आश्रय गेल्या काही दिवसांपासून घेत कोठून ना कोठून हा बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास येत आहे, या भागातील शेतकरी बाळासाहेब दरदले यांच्या कुत्र्याचा फडश्या बिबट्याने पाडला. त्यानंतर आप्पासाहेब घावटे यांच्या शेळीवर हल्ला चढवला दरम्यान नागरिकांनी,कुत्र्यांनी हा डाव हाणून पाडला, त्यात शेळी जखमी झाली आहे.जवळ बंधारा न.२ च्या दिशेने बिबट्याने धूम ठोकली. या घटनेने परिसरात शेती काम करण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे.
दरोरोज बिबट्या दिसत आहे,जीवित हानी होण्याअगोदर व रात्री बेरात्री नागरिक घराबाहेर पडत आहेत,काही दुर्घटना घडू नये, म्हणून वनखात्याने पीजरा लावण्याची मागणी रमेश लिपाने व आप्पासाहेब घावटे यांनी केली आहे.