महाराष्ट्र

अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाचे 17वे त्रैवार्षिक अधिवेशन नाशिक येथे संपन्न होणार

नाशिक प्रतिनिधी

  भारतीय मजदूर संघ ह्या केंद्रीय कामगार संघटनेला संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघाच्या सुवर्ण जयंती वर्षातील 17वे त्रिवार्षिक अधिवेशन दिनांक 14 व 15मे 2022 रोजी नासिक येथील पुणे विद्यार्थी वस्तीगृह संचालित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात संपन्न होत आहे

20 राज्यातील 500 महासंघाचे पदाधिकारी प्रतिनिधी ह्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत . कोविड प्रतिबंधासाठी शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे पूर्णतः पालन करून हे अधिवेशन संपन्न होईल. अशी माहिती अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संघटनमंत्री विलासराव झोडगेकरांनी अधिवेशन आढावा बैठकीत पदाधिकारी यांना संबंधीत करताना सांगितली आहे.
   ह्या ऐतिहासिक अधिवेशनाचे उदघाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संस्थापक सदस्य व भूतपूर्व अध्यक्ष श्री के के हरदास यांच्या हस्ते होईल तर महाराष्ट्र प्रदेश भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष श्री अनिल जी ढूमणे हे स्वागताध्यक्ष ह्या नात्याने देशभरातून आलेल्या प्रतिनिधींचे व पाहुण्यांचे स्वागत करतील.
भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री बी सुरेंद्रन जी, राष्ट्रीय मंत्री श्री रामनाथ गणेश जी हे विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक आहेत भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रिय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश,उद्योग प्रभारी श्री अख्तर हुसेन जी आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि विद्युत निगम प्रभारी श्री एल .पी .कटकवार जी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन सर्वांना लाभणार आहे.
हे दोन दिवसीय 17वे त्रिवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन श्री आर मुरलीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल व श्री अमर सिंह सांखला महामंत्री हे अधिवेशन चे संचालन करतील.
विद्युत क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या,केंद्र व राज्य सरकारे घेत असलेले परस्परविरोधी निर्णय,कामगार व कामगार संघटना विरोधी पारित झालेले कायदे शासकीय विद्युत क्षेत्राचा होत असलेला संकोच , विद्युत क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबतीत, आदी विषयांवर ह्या अधिवेशनात सखोल चर्चा होऊन आगामी रणनिती निश्चित्त केली जाईल विद्युत क्षेत्रापुढे येणाऱ्या आव्हानांचा तितक्याच खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी संपुर्ण जबाबदरी युवा नेतृत्वाकडे सोपवली जाईल,

महत्वपूर्ण प्रस्ताव पारित होतील.
सुवर्ण जयंती वर्षात संपन्न होणाऱ्या हे अधिवेशन घेण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे व या संधीचे सोने करणयाचा निर्धार कामगार महासंघाचे अध्यक्ष श्री विठ्ठल  भालेराव  व महामंत्री श्री अरुण पिवळ यांनी केला असून  अधिवेशन संयोजनाची संपूर्ण जबाबदारी नाशिकच्या कार्यकर्त्यांवर सोपवली आहे व त्यानुसार नाशिकची टीम कामाला लागली असल्याचे अधिवेशन संयोजक व संघटन मंत्री श्री विलास झोडगेकर यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button