इतर
खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत घेतले सपत्नीक साई दर्शन !.

शिर्डी प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिर्डीतआज सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेतले. . साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव,यानी सत्कार केला यावेळी माजी विश्वस्त सचिन कोते, संजय शिंदे, सचिन चौगुले, सुनील परदेशी, स्वाती परदेशी, रवी शिंदे, मुकुंद सिनगर, सुहास वहाडणे आदी उपस्थित
होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पैगंबराविषयी बोललेल्या नुपूर शर्मावर लगेच कारवाई झाली मग छत्रपतींचा अपमान करणाऱ्यावर कारवाई का नाही..? असा प्रश्न उपस्थित करत भाजपमध्ये ठरवून छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा सुरु असल्याची टीका राऊत यांनी केली.