संगमनेरात झिंगाट परप्रांतीय तरुणाची केली धुलाई!

संगमनेर प्रतिनिधी
: संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ भर दिवसा एका नशेतअसणाऱ्या झिंगाट परप्रांतीय तरुणाने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानंतर मात्र या तरुणांची चांगलीच धुलाई झाली
एका विद्यार्थिनी ची त्याने छेड काढली त्यावेळी तरुणीने जोरात आरडाओरडा केल्यावर नागरिकांनी झिंगाट परप्रांतीय तरुणाची धुलाई करत त्याला पोलिसांच्या हवाली केले. शनिवारी सकाळी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने पालक वर्गातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
संगमनेर शहरात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर माणसांची मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वर्दळ असणाऱ्या ठिकाणी संगमनेर बस स्थानक आहे. या बस स्थानकापासून उत्तर दिशेला महाविद्यालये आहेत. त्यामुळे या महाविद्यालयात जाण्यासाठी ग्रामीण भागातील आणि शहरातील अनेक तरुण तरुणी या रस्त्याने अगदी पहाटेपासून जा ये करत असतात. या रस्त्यावरच शासकीय विश्रामगृह आहे.
या विश्रामगृहाजवळ मध्य प्रदेश येथील जयपाल कोयके हा परप्रांतीय तरुण नशेमध्ये बेधुंद झाला होता. यावेळी झिंगाट झालेल्या या परप्रांतीय तरुणांने महाविद्यालयात जाणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढली विद्यार्थिनीने जोरजोरात आरडाओरडा केल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी छेड काढणाऱ्या परप्रांतीय तरुणाची येथेच्छ धुलाई केली.
शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी देखील पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत कारवाईची मागणी केली. शहरातील महाविद्यालय परिसरामध्ये अनेक तरुण विनाकारण फिरत असतात. अशा तरुणांवर कारवाई व्हावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी विद्यार्थिनींची सुरक्षा व्हावी, छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा म्हणून मोठा गाजावाजा करत दामिनी पथकाची स्थापना केली होती. या पथकाच्या प्रमुख म्हणून शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. निकिता महाले यांनीही छेड काढणाऱ्या काही तरुणांना आपला खाक्या दाखवत कारवाई केली होती. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाल्यावर हे पथकही बंद करण्यात आले. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणीही काही तरुणांकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार समोर येऊ लागले