आरोग्य मंत्री सावंत यांची रुग्ण हक्क परिषदेचे शिस्टमंडळाशी चर्चा

मुंबई दि. 4- आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज रुग्ण हक्क परिषदेच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना विशेष आमंत्रित करून आज त्यांच्याशी चर्चा केली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत रुग्ण हक्क परिषदेने सुचवलेल्या त्रुटी लवकरच दूर करू अशी हमी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
आरोग्य मंत्रालयातर्फे राबवल्या जाणारा विविध योजना, रुग्णांवर विनाविलंब तात्काळ उपचार सुरू झाले पाहिजेत त्यासाठीचे शासन निर्देश, निर्धन व गरीब रुग्णांना पैशा अभावी उपचार मिळत नसतील तर ही बाब म्हणजे शोकांतिका आहे, असे उमेश चव्हाण म्हणाले.
यावेळी रुग्णहक्क परिषदेच्या शहराध्यक्ष अपर्णाताई साठ्ये- मारणे, शहर कार्याध्यक्ष नितीन चाफळकर, उपाध्यक्ष यशवंत भोसले, केंद्रीय कार्यालय सचिव संजय जोशी, संघटक स्वप्निल जोगदंड, सचिव प्रतीक चोपडे उपस्थित होते.