जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे कार्यतत्पर नेतृत्व सुजित झावरे पाटील

पारनेर:-काल वडगाव सावताळ ग्रामपंचायतच्या गलथानपणा मुळे जाणीवपूर्वक पाण्याची टंचाई निर्माण होत असताना वडगाव येथील पाझर तलाव परिसरातील विद्युत पुरवठा करणाऱ्या पाच डिपीचे वीजजोड प्रशासनाच्या माध्यमातून सदर वीजजोड सांगून तोडले.सदर ठिकाणी घरगुती वीज,पिण्याच्या पाण्याचा,जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असता रविवारी सायंकाळी पारनेर तालुक्याचे कार्यतत्पर नेतृत्व सुजित झावरे पाटील यांनी वडगाव सावताळ येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांसमोर संपर्क करत सदर प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले. असता त्यांनी सोमवारी सकाळी तत्काळ सदर वीजजोड पूर्ववत करत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. अत्यंत महत्वाचा प्रश्न तातडीने दखल घेत मार्गी लावल्याबद्दल वडगाव सावताळ ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले