इतर
मंत्री छगन भुजबळ यांची पतंगबाजी!

नाशिक प्रतिनिधी :-
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी उत्सव साजरा करत असतांना नागरिकांनी कोरोनाबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मोहन शेलार,वसंत पवार, दिपक लोणारी,ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर इ. उपस्थित होते.