डाॅ.डी.वाय.पाटील महाविदयालयात विभागीय अविष्कार स्पर्धेचे आयोजन

पुणे दि ६
सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ अविष्कार स्पर्धेच्या विभागीय स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी डाॅ.डी.वाय पाटील युनिटेक सोसायटीच्या डाॅ.डी.वाय.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी या ठिकाणी करण्यात येणार आहे.
विदयार्थ्यांमधील कौशल्य उतुंग विचार यांच्या जोरावर तसेच विविध स्पर्धांमधील सहभागामुळे यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येते. विदयार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अविष्कार या स्पर्धेचा मोलाचा वाटा आहे. राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत सहभागी संघ निवडीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाअर्तंगत महाविदयालयीन पातळी, विभागपातळी तसेच विदयापीठपातळी या स्तरांवर अविष्कार स्पर्धेचे आयोजन करून यातून निवड झालेल्या विदयार्थ्याचा संघ अंतीम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येतात.
या विभागीय अविष्कार स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाअर्तंगत असणा-या पिंपरी चिंचवड तसेच लोणवळा, जुन्नर, मावळ विभागात येणा-या महाविदयालयांमधुन प्युअर सायंन्स, फाईन आर्टस, काॅमर्स, अॅग्रीकल्चर, इंजीनअरींग टेक्नाॅलाॅजी अशा विविध विभांगांसाठी 250 संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातुन 500 संशोधक विदयार्थी सहभाग नोंदवतील.
शैक्षणिक वर्ष 2022 -23 च्या या अविष्कार विभागीय स्पर्धेचे आयोजन डाॅ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, अध्यक्ष मा.डाॅ.पी.डी.पाटील, उपाध्यक्ष मा.डाॅ.सोमनाथदादा पाटील, विश्वस्त मा.डाॅ.स्मिता जाधव तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डाॅ.मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.