पारनेर तालुक्यात पुढाऱ्यांच्या दोन गटात ढाब्यावर हाणामारी !

झाकली मूठ सव्वा लाखाची!….
जवळ्यातील पुढाऱ्यांच्या
दोन गटांत गल्लीच्छ शिवीगाळ व हाणामारी
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील जवळ्यात पुढाऱ्यांच्या दोन आजी माजी गटात जबरदस्त हाणामारी झाली काही आजी माजी पुढारी एक ढाब्यावर मद्य प्राशन करत होते त्यातून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा तुफान राडा झाला
याबाबत अधिक माहिती अशी की ,जवळ्यातील काही आजी – माजी पदाधिकारी जवळ्यातील एका नामांकीत ढाब्यावर मद्य प्राशन करत बसले होते . त्यावेळी तिथे गावातील एका स्वयंघोषीत प्रतिष्ठीत विद्यमान पदाधिकार्याचे आगमन झाले .
त्यावेळी त्यातील काही पदाधिकारी यांनी त्यांना पंगतीत सामील होण्याची ऑफर दिली . सदर पंगतीला त्यांच्यात मतभेद असणारा एक माजी पदाधिकारी
बसलेला होता . त्याने त्या प्रतीष्ठीत पदाधिकार्याला आपल्या मौल्यवान बैठकीतील मद्य(दारू) देण्यास नकार दिला . व उरलेली दारू बाटलीत भरून खिशात घालती .हे पाहुन हा प्रतिष्ठीत पदाधिकारी संतापला व गल्लीच्छ शिवीगाळ करू लागला .शिवीगाळ सुरू झाल्याने पेल्याची बात आता टोल्यावर येवू लागली त्यातल्या एका सुज्ञ मद्यपीने ही खबर शिवीगाळ झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या घरी दिली . व
त्यानंतर त्या पदाधिकाऱ्याच्या घरच्या महीला मंडळाने विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्याची जोरदार धुलाई केली .
घोटभर दारूवरून झालेला या वादाची जवळ्यात दोन दिवसांपासुन खमंग चर्चा रंगली आहे .
तर , यावरून मार खाल्लेले पुढारी मात्र तो मी नव्हेच अशा आर्विभावात गावात सध्या फिरत आहेत .
ग्रामस्त मात्र याची मोठ्या चवीने चर्चा चाखत आहेत . तर , त्यांचे जवळचे काहीजन ” झाकली मुठ सव्वा लाखाची ” म्हणून मुग गिळून आहेत .एकुनच घोटभर दारुपायी या थराला जाणारे पुढारी गावगाड्याच्या विकासातही अशाच प्रकारे चांगल्या कामांना खोडा घालताना दिसुन येतात .