डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात ‘विभागीय आविष्कार -२०२२ स्पर्धा’ सम्पन्न!

आकुर्डी ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आविष्कार- २०२२ विभागीयस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विभागस्तरीय स्पर्धेत मानव्यविद्याशाखा, भाषा व ललित कला या विभागातून ५०, वाणिज्य, व्यवस्थापन आणि लाॕ विभागातून-४४, सायन्स विभागातून 98, कृषी आणि प्राणिशास्त्र विभागातून- १०७ इत्यादी संशोधन प्रकल्पासह ५०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाविद्यालयीनस्तरावरील स्पर्धेतून ज्या विद्यार्थ्यांचे नाविण्यपूर्ण संशोधन प्रकल्प होते ते विद्यार्थी या विभागस्तर स्पर्धेत सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनेला वाव देऊन त्याच्या संशोधनाला एक व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने आविष्कार ही स्पर्धा – २००६ साली महाराष्ट्राचे तत्कालीन महामहिम राज्यपाल श्री. एस.एम. कृष्णा यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे. कोविडचे दोन वर्ष सोडले तर या स्पर्धेचे हे पंधरावे वर्ष आहे. या विभागीय स्पर्धेच्या उद् घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आय.क्यु. ए. सी. चे संचालक डाॕ. संजय ढोले हे होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आविष्कार स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या वर्षी महाराष्ट्र राज्याचे आविष्कारचे विजेतेपद आपल्या विद्यापीठालाच मिळेल असे मत व्यक्त केले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आपल्या प्रास्ताविकात आविष्कार स्पर्धेचा हेतू आणि उद्देश सांगितला. आविष्कार स्पर्धेचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. राधाकृष्ण ठाणगे यांनी स्पर्धेचा लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे डाॕ. रणजित पाटील हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतन सरवदे यांनी केले तर आभार प्रा. डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले.
या विभागीय स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डाॕ. राम गंभीर, डाॕ. वैभव जाधव, डाॕ. किशोर निकम, डाॕ. प्रशांत साठे, डाॕ. माधव सरोदे, डाॕ. अजित धात्रक, डाॕ. डी. एम. महाजन, डाॕ. रितेश चौधरी, डाॕ. संदीप जाधव, डाॕ. मानसी कृर्तकोटी, डाॕ. उज्ज्वला शिंदे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील , उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी सहभाग नोंदविला.
○
