माळकूप येथे दत्त जयंतीस सभामंडपाचे सभापती दाते सर यांचे हस्ते लोकार्पण !

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
जिल्हा परिषद सेस पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत माळकुप येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर सभामंडप उभारण्यात आला, त्याचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले उपस्थित होते. दत्त जयंती निमित्त स्वामींची महाआरती सभापती काशिनाथ दाते सर व शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांच्या शुभहस्ते झाली. ह. भ. प. बालाजी महाराज बोराडे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले होते.
कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सभापती दाते सर म्हणाले दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींच्या सभामंडपाचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला मिळाले,हे स्वामींचे आशीर्वाद असे मी समजतो. माझ्या जिल्हा परिषदेच्या सेस मधून या देवस्थानास पाच लक्ष रुपये दिले आणि आज तो सभामंडप पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले. जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपून जवळपास नऊ महिने झालेत सरकारची निवडणूक घेण्याची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे शासनाचा पैसा शिल्लक असतानाही त्याचा विनियोग होत नाही? का तर जिल्हा परिषद मध्ये सदस्य, पदाधिकारी नाहीत. मध्यंतरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली रस्ते खराब झाले, काही सी.डी. वर्क वाहून गेले परंतु पैसे असूनही त्यावर खर्च झाला नाही, दुरुस्त्या झाल्या नाहीत, तुम्ही मला जो रस्ता करून देण्याची मागणी केली निवडणुकीनंतर मी करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. मलाही त्यांच्यातून उतराई होण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा करतो. येथे स्वामींच्या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. भाविकही मोठ्या संख्येने येथे दर्शनास येतात. आपण आम्हाला बोलावले महाआरतीचा मान दिला आपले सर्वांचे आभार मानतो आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना धन्यवाद देतो.
: अतिशय उशिरा परंतु अल्पशा मागणीवरून सभापती दाते सरांनी आम्हाला स्वामी समर्थ मंदिर समोर सभामंडप देण्याचे मान्य केले. दिलेला शब्द सरांनी पाळला, देवस्थानच्या सभामंडपास निधी उपलब्ध करून दिला
– बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच माळकुप.)
यावेळी डिझायनर किरणजी पंडित, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, संतोष रोहोकले सर, अशोक शिंदे, अजित शिंदे, प्रतीक नाबगे, अनिकेत नाबगे, अभिषेक नाबगे, किरण शिंदे, तेजस नाबगे, अक्षय नाबगे, अक्षय शिंदे, सुमित शिंदे, ओम शिंदे, किरण खंडागळे, हर्षल काळे, संकेत नाबगे, निकी शिंदे, अभिषेक शिंदे, पंकज नेव्हे, सुयश शिंदे, शरद शिंदे, नितीन चत्तर, किरण शिंदे, प्रणय खोडदे, रवी कोडदे, वैभव शिंदे, तेजस शिंदे, देविदास शिंदे, प्रतीक खडके, मयूर काळे, शिवाजी पंडित, राजेंद्र शिंदे, अभय भिसे , गंगा नाबगे, रामदास गवळी ,सदाशिव शिंदे सर, विजय नाबगे, दिपक शिंदे , संभाजी नाबगे, भास्कर काळे किरण पंडित, कृष्णा शिंदे , योगेश शिंदे, सागर शिंदे , गणेश शिंदे , ऋषिकेश नाबगे ,संतोष रोहोकले ,चेतन शेठ कुंभकर्ण, विकास मोळके , योगेश कुंभकर्ण , सुमित रोहोकले,आदिनाथ भागवत,बबलू बेल्हेकर, जितेंद्र कटारिया, शुभम काळे, रवी जगदाळे इत्यादी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले तर सर्वांचे आभार संतोष रोहोकले सर यांनी मानले.