इतर

नाशिक रोटरी आरोग्यमाला उपक्रमाची लवकरच वर्षपूर्ती

नाशिक प्रतिनिधी1

समाजातील आरोग्याबाबत जागरूकता आणि कल्याणास प्रोत्साहित करण्यासाठी वर्षभरापासून रोटरी आरोग्यमाला कार्यरत आहे .तो अतिशय लोकप्रिय तसेच १०४ भागांच्या माध्यमातून यशस्वी ठरला .

वैद्यकीय ज्ञान  सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि विविध विकारांविषयी गैरसमज दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत,मानद सचिव शिल्पा पारख,सचिव प्रशासन हेमराज राजपूत, वैद्यकीय  सेवा संचालक मकरंद चिंधडे , रोटरी आरोग्यमाला समितीप्रमुख डॉ नेहा मेहेर ह्यांच्या एकत्रित प्रयत्नाने राबविला गेला.

प्रत्येक आठवड्यात दोनदा तज्ञ डॉक्टरांचे विवध विषयांवर मार्गदर्शन रेडिओ विश्वास वर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाची लवकरच वर्षपूर्ती होत आहे

या संपूर्ण प्रवासात, आरोग्य तज्ञ आणि विविध क्षेत्रांतील डॉक्टरांनी त्यांचा मौल्यवान वेळ दिला आहे आणि त्यांचे ज्ञान सामान्य व्यक्तींना कळेल अशा सोप्या भाषेत संवाद साधला.

श्रोत्यांना आरोग्यासाठी योग्य निर्णय घेण्यास, प्रतिबंधात्मक काळजी घेण्याच्या पद्धतींचा अवलंब करण्यास आणि सामान्य आणि गंभीर आरोग्याची स्थिती समजून घेण्यास मदत केली आहे.

सामान्य व्यक्तींच्या शंका,प्रश्न,अभिप्राय ह्यांनी हा उपक्रम अधिकाधिक ज्ञानवर्धक ठरला.

सातत्याने वर्षभर उपक्रम राबविण्यास यशस्वी ठरलेल्या डॉ नेहा मेहेर ह्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी रेडिओ विश्वास चे केंद्र प्रमुख हरी कुलकर्णी व सहभागी डॉक्टरांचे विशेष आभार मानलेत.

१)मयूर तांबे – न्यूरो कोच
२)डॉ नेहा मेहर – डोकेदुखी व मायग्रेन विशेषज्ञ
३)डॉ स्वप्नील विधाते – नेत्ररोग तज्ज्ञ
४)डॉ विनय कुलकर्णी – ईएनटी
५)डॉ श्रीया कुलकर्णी – ईएनटी
६)डॉ प्रसाद अंधारे – हृदयरोग तज्ज्ञ
७)डॉ पुरुषोत्तम पुरी – विभागीय रक्त केंद्र प्रमुख
८)डॉ गौरी कुलकर्णी – छाती आणि वेदनाशामक काळजी
९)डॉ अनिता नेहेते – भूलतज्ज्ञ
१०)डॉ मदनूरकर – कर्करोग तज्ञ
११)डॉ हिमानी दालमिया – चाइल्ड फिजिओथेरपिस्ट
१२)डॉ अंचल दिनानी – फिजिओथेरपिस्ट
१३)डॉ मैथिली भाके – एक्वा थेरपेस्ट
१४)डॉ राकेश गोसावी – ऑर्थोपेडिक
१५)डॉ अस्मिता ढोकरे मोरे – संधिवात तज्ञ
१६)डॉ महेश मांगुळकर – पोटविकार तज्ञ
१७)डॉ चंद्रकांत संकलेचा – स्त्रीरोगतज्ज्ञ
१८)डॉ चारुशीला घोंगडे – स्तनपान
१९)डॉ. योगेश घोंगडे – होमिओपॅथी
२०)डॉ अनिरुद्ध ढोकरे – नेफ्रोलॉजिस्ट
२१)डॉ दीपेंद्र चौधरी – फिजिशियन
२२)डॉ श्रद्धा चौधरी – त्वचारोगतज्ञ
२३)डॉ सोनल काळे – स्त्रीरोग तज्ज्ञ
२४डॉ विश्वजीत दळवी – दंतचिकित्सक
२५)डॉ मंजिरी जोशी – आहारविशेषज्ञ
२६)डॉ पल्लवी सामंत – फिजिओथेरपिस्ट
२७)डॉ. राजेंद्र नेहेते – प्लास्टिक सर्जन
२८)डॉ चंद्रतेज कदम – न्यूरोसर्जन
२९)डॉ श्रेया कदम-त्वचारोगतज्ञ

या सहभागी तज्ञ व सुप्रसिद्ध डॉक्टर्स ह्यांचे आरोग्य मालिक वर्षभरमोफत मार्गदर्शन लाभले.

  1. ↩︎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button