मनसेचे भिक मांगो आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित.

अकोले प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील लोटस इंग्लिश स्कुल वडगाव पान येथे शिकणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी शाळा बदलून मिळावी.यासाठी दोन दिवसांपासुन प्रकल्प कार्यालय राजुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिक मांगो आंदोलन चालू होते.मागील दोन वर्षापासून अनेक समस्यांचा विदयार्थांना सामना करावा लागतो.स्वच्छतेपासून ते रहाणीमानापर्यंत अशा २८ अडचणींचा विदयार्थ्यासह पालकांना सामना करावा लागतो.अशी माहीती मनसेचे ज्ञानेश्वर लेंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
वरील अडचणींमुळे मनसेचे ज्ञानेश्वर लेंडे,सिकंदर पोपेरे यांसह विदयार्थी पालक,महिला यांनी प्रकल्प कार्यालय राजुर येथे भिक मांगो आंदोलन केले. यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी लेखी आश्वासन देल्याने सदर अंदोलन स्थगित करण्यात आले.
संगमनेर येथील लोटस इंग्लिश स्कुल वडगाव पान येथे विविध समस्या असल्याने इ.३री च्या १४ विदयार्थाना शाळा बदलून देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.प्रकल्प कार्यालयाने सदर प्रस्ताव अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना सादर केला आहे.सदर विदयार्थांना इ.६वी मध्ये प्रवेशीत होतील तेव्हा एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल मवेशी येथे प्रवेश देण्यात येईल अशी प्रकल्प अधिकारी राजुर यांनी लेखी माहीती दिल्याने सदर अंदोलन मागे घेण्यात आले.
