सर्वोदय विदया मंदिर खिरविरे येथे क्रिडा मोहत्सव संपन्न.

अकोले/प्रतिनिधी-
कला व विज्ञान यामध्ये डोकावून पहाण्यासाठी खेळ हि एक उघडी खिडकी आहे.जीवनात प्रत्येक क्षण सोनेरी असतो,फक्त त्या सोनेरी क्षणांना पारखणारी नजर आपल्याकडे हवी. असे प्रतिपादन खिरविरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष बेणके यांनी केले.
अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे शालेय अंतर्गत वार्षीक क्रिडा मोहत्सवाचे आयोजन केले होते. आ यावेळी उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे लोकनिर्वाचित सरपंच गणपतराव डगळे,माजी सदस्य त्रिंबक पराड,रामदास धोंगडे,प्राचार्य लहानू पर्बत,लिपिक भास्कर सदगिर,क्रिडा विभाग प्रमुख संपत धुमाळ यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.
सुभाष बेणके यांनी पुढे बोलताना,खेळामुळे शरीर, मन दोघेही निरोगी रहातात.खेळ हे आपल्याला वेळेचे बंधन,धैर्य,शिस्त,गटामध्ये काम करणे, एकमेकांना सहकार्य करणे या महत्वपूर्ण गोष्टी शिकवतात.म्हणून सर्वांनी खेळात सहभागी होण्याचे अव्हान केले.
सरपंच गणपतराव डगळे यांनी खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास व सुधरविण्यास मदत करतात.नियमित खेळ खेळल्याने आपण अधिक निरोगी राहू शकतो. खेळ व्यस्त जीवनात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे विचार प्रतिपादीत केले.
माजी सदस्य त्रिंबक पराड यांनी अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्व आहे.शिक्षणामुळे चिंतन,मनन,व्यक्तीचा मानसिक विकास होतो,तर व्यायाम, खेळ शारीरीक विकास करतात. असे विचार प्रतिपादीत केले.
प्राचार्य लहानू पर्बत यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदाने शिकवते.शरीर ईश्वराची देणगी असून त्याला निरोगी ठेवणे आपले कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने खेळात भाग घेणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त करून उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सचिन लगड यांनी केले.तर कविता वाळुंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शालेय अंतर्गत वार्षीक क्रिडा मोहत्सवात कबड्डी,धावणे,लांबउडी,उंचउडी, थाळीफेक,गोळाफेक आदी स्पर्धां संपन्न करण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वीतीय,तृतीय क्रमांक काढणार असून या क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव करणार असल्याची माहीती क्रिडा विभागप्रमुख संपत धुमाळ यांनी दिली.
क्रिडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्राचार्य लहानु पर्बत, संपत धुमाळ, कविता वाळुंज,भरत भदाणे,प्रविण मालुंजकर, नानासाहेब शिंदे, धनंजय लहामगे,भाऊसाहेब कोते, रामदास डगळे, सचिन लगड,विक्रम आंबरे, योगेश शिंदे, संगिता भांगरे,वनिता बेंडकोळी,सुधिर पराड,प्रकाश भांगरे, सौरभ मोहटे,पि.के.बेणके,सुनिल देशमुख यांसह विदयार्थी यांनी परीश्रम घेतले.