इतर

रोटरी मिन्स बिझिनेस नाशिक क्लबच्या अध्यक्षपदी सागर भदाणे!

नाशिक /प्रतिनिधी

नाशिक येथील रोटरीच्या मैत्रिपूर्ण संबधातुन व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टीकोनातून कार्य करणाऱ्या रोटरी मिन्स बिझिनेस नाशिक क्लबच्या अध्यक्षपदी सागर भदाणे यांची सन २०२२-२३ या वर्षासाठी निवड झाली आहे. संस्थेचे मावळते अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांचेकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

रोटरी मिन्स बीझिनेस नाशिक (RMB NASHIK) चा तिसरा पदग्रहण सोहळा हॉटेल एनराइझ बाय सयाजी येथे रोटरी डिस्स्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर, उपप्रांतपाल अनिल सुकेनकर, संजय कलंत्री, रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्ष डॉ.श्रिया कुलकर्णी, दिलीपसिंग बेनिवाल, प्रफुल्ल बरडीया यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी माजी सचिव सागर भदाणे यांनी त्यांचा पदभार कृषिदूत डॉ. रामनाथ जगताप यांच्याकडे सुपूर्त केला.

जगभरातील कोणतेही रोटेरियन
हे आरएमबी (RMB) क्लबचे सभासद होऊ शकतात. रोटरी सभासदांनमध्ये जास्तीत जास्त व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे, उद्योग विकासाला चालना देणे यासाठी आरएमबी क्लब प्रयत्नशील असतो. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील हा एकमेव क्लब असून क्लबचे हे तिसरे वर्ष आहे.

कार्यक्रमात नवनिर्वाचित उपाध्यक्ष विक्रम बालाजीवाले, सीए नितीन ब्रम्ह, भूषण पाटकर, स्मिता अपशंकर, ओम प्रकाश रावत, उन्मेष देशमुख, मनोज केंगे, एकता अग्रवाल, पदमेश भावसार आदी आरएमबी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. राजेश्वरी बालजीवले आणि शरयू भदाणे यांनी केले.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button