जीवनात एक तरी कला अवगत असणे आवश्यक -अरविंद गाडेकर

संगमनेर :- अहमदनगर जिल्हा विद्या प्रसारक समाजाचे राजर्षी शाहू महाविद्यालय, देवळाली प्रवरा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बहि:शाल शिक्षण मंडळ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे ‘व्यंगचित्र जीवन जगण्याची कला’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी अरविंद गाडेकर म्हणाले, ” कोणत्याही दिवसाची सुरुवात एक मिनिट शांततेने किंवा मौनेने करा असा आपल्याला सांगितलं जातं, हे खरे आहे पण एक दिवस एखाद्या तरी व्यंगचित्र वाचण्याचा संकल्प करा, व्यंगचित्रातून आलेल्या चटकदार, चमकदार कल्पना केवळ हास्य निर्मितीसाठी झालेल्या नसतात, जीवन पद्धतीवर एका वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य केलेले असते. वेगळ्या दृष्टीकोणातून प्रकाश टाकलेला असतो आणि भाष्य केलेले असते म्हणूनच जीवनात एक तरी कला अवगत असणे खूप गरजेचे आहे. कला तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल. “
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.शेख यांनी भूषविले आणि यावेळी अध्यक्षा यांनी अरविंद गाडेकर यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हापसे एस.एम., प्रा.टेकाळे आर. पी. ( केंद्रवाह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रा.कटके, प्रा. अविनाश मेहत्रे यांनी खूप परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कावेरी यांनी केले.