अकोलेच्या कन्या ची थायलंड ला साॅफ्टबाॅल च्या भारतीय संघात निवड

अकोले ( प्रतिनिधी )- भारतीय सिनियर महीला साॅफ्टबाॅल संघात अकोल्याची कन्या कुमारी फिझा फत्तुभाई सय्यद हीची भारतीय संघात निवड झाली आहे.
थायलंड पट्टाया येथे १४ ते १७ डिसेंबर २०२२ रोजी येथे होणाऱ्या एशियन महिला युनिवर्सिटी साॅफ्टबाॅल चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय महिला संघात फिझा हिचा समावेश झाला आहे. महाराष्ट्राची फिझा सय्यद हिने महिला साॅफ्टबाॅल खेळामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. या आधी ही तिने १९ वर्षा खालील संघात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
थायलंड स्पर्धेत जाण्याआधी भारतीय साॅफ्टबाॅल असोसिएशन मार्फत दि. ७ ते ११ डिसेंबर पर्यंत ओरिसा येथे भारतीय महिला साॅफ्टबाॅल टिम चा सराव कॅम्प बाराबती अंतरराष्ट्रीय स्टेडियम,कटक येथे चालू आहे व तेथून कोलकता येथून थायलंड ला टिम रवाना होणार आहे.
कुमारी फिझा सय्यद हिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. तिच्या या यशात तिचे आई वडील व कोच यांचे मोठे योगदान आहे.