इतर
गायरान जमीन धारकांसाठी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे श्रीरामपूर तहसील समोर निदर्शने…!!!

श्रीरामपूर /प्रतिनिधी
: महाराष्ट्रातील दलीत आदीवासी गायरान धारक गेल्या १०० वर्षांपासून भुमीहीन असून त्यांनी आपापल्या गावी जमिनीत घरकुल झोपडी बांधुन राहात आहे या नागरीकांना बेघर करण्याच्या नोटीसा मागे घेण्यात याव्या या मागणीकरीता अन्याय अत्याचार निर्मुलन समिती च्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ.रमाताई भालेराव यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपूर तहसीलदार कार्यालया समोर निदर्शने करण्यात आले
या बाबतचे निवेदन श्रीरामपूर चे तहसीलदार यांना सादर करण्यात आले. या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमाताई भालेराव कायदेशीर सल्लागार एँड.बाबासाहेब पाठक, जिल्हा उपाध्यक्ष प्रविणकुमार कदम, ज्योतीताई म्हस्के, स्वाती बागुल, परवीन शहा, ब्राह्मणगांव वेताळचे सरपंच मनिषा शिंदे हे उपस्थित होते.