समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर – शिर्डीचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे होणार आहे. पहिल्या पंचवार्षिक मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘ड्रीम प्रॉजेक्ट’ पैकी एक असलेला ७०१ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाचे भूमिपूजन समारंभ डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाला. “ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन आम्ही करतो, त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतो” ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संकल्पना फडणवीस यांनी जोपसली आहे. महाराष्ट्राला समृद्ध करणारा महामार्ग असेल.
जनतेच्या मनाशी जोडणारा महामार्ग- राज्याच्या राजधानीचा उपराजधानीशी थेट जोडलेला हा पहिला महामार्ग आहे. ७०१ किलोमीटर अंतरचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होणार. समृद्धी महामार्गामुळे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण हे विभाग जोडल्याने या चार विभागातील शेतकऱ्यांना, व्यावसायिक , उद्योजकांना दळणवळणात सुलभता निर्माण होईल. राज्यातील २० जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जात असून, तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव असणार. समृद्धी महामार्ग पहिला महामार्ग असेल की, ज्यात गावे किंवा शहरे विस्थापित झालेली नाहीत.
राज्यातील पर्यटन , धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना एकत्र जोडणारा समृद्ध महामार्ग – या महामार्गामुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे एका मार्गावर आलेली आहेत. पर्यटन स्थळात लोणार सरोवर, वेरूळ अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान समृद्धी महामार्गावर जोडली आहेत. धार्मिक स्थळात बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराज शेगाव आणि नगर जिल्ह्यातील शिर्डी ही महत्त्वाची धार्मिक स्थळाची कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. ऐतिहासिक स्थळात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्लाच्या परिसरातून हा महामार्ग जात असल्याने ऐतिहासिक पर्यटन स्थळ ही या समृद्धी महामार्गाने एकत्र आलेले आहेत.
राज्यातील एकमेव ‘ग्रीन फिल्ड’ इंडस्ट्रीयल कॉरिडॉर महाराष्ट्रातील पहिला ‘ग्रीन फिल्ड’ महामार्ग अशी नोंद समृद्धी महामार्गाची होणार.मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाचे ग्रीन कॉरिडॉरमध्ये रूपांतर होणार आहे. एमएसआरडीसीने रस्त्यालगत १२.६८ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय द्रुतगती मार्गाच्या मध्यभागी १२.८७ लाख लहान झाडे आणि झुडपे आणि कंपाउंड वॉलच्या आत ३.२१ लाख झुडपे लावण्यात येणार आहेत. कॉरिडॉरच्या बाजूने २५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची सरकारची योजना आहे. या समृद्धी एक्सप्रेस वे हरित प्रकल्पासाठी अंदाजे ९०० कोटी रुपये खर्च येणार आहे, ज्यामध्ये सात वर्षांसाठी झाडे आणि झाडांच्या देखभालीचा खर्च देखील समाविष्ट आहे. तसेच, समृद्धी एक्सप्रेस वेच्या प्रत्येक झाडाला जिओटॅग केले जाईल.
प्रति तास १५० किलोमीटरच्या वेगाने वाहने महामार्गावर धावणार- यामुळे नागपूर – मुंबई प्रवास आता ८ तासात पूर्ण होणार आहे. एकाच महामार्गावर २० जिल्ह्याच्या २६ तालुक्यातील ३९२ गावांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी २४ ठिकाणी प्रवेश मार्ग आणि बाहेर पाडण्याचे ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या २४ ठिकाणी टोल नाके निर्माण केले आहेत.
समृद्धी महामार्ग इंडस्ट्रीयल कॉरिडॉर अशीही ओळख निर्माण होणार आहे. कारण, नागपूर मधला ‘मिहान’ कॉरिडॉरशी कनेक्टिव्हिटी निर्माण समृद्धी महामार्गामुळे झाली आहे. राज्यात उद्योग धंदे वाढीसाठी महामार्गालगत औद्योगिक वसाहतीसाठी इंडस्ट्रियल भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. भविष्यात या महामार्गालगत १० ते १५ लाख रोजगाराच्या संधी विविध क्षेत्रात निर्माण होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मरारविम) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल. सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी १५० किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी १०० किमी असेल. राज्य सरकार या मार्गावर २४ शहरे तयार करणार आहे. या शहरांत अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य व्यवस्थापन केंद्रे, आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्था असतील. या प्रकल्पासाठी १० जिल्ह्यांतून एकूण २८,२८० हेक्टर जमीन अधिग्रहित केली गेली आहे, त्यातील ८,५२० हेक्टर महामार्गासाठी वापरली जाणार आहे तर १०,८०० हेक्टर ही नवीन नगरांसाठी असेल. प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी मरारविमला बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे. महामार्गावरील पूर्व बांधकाम कार्याचा वेग वाढविण्यासाठी, मरारविमने या प्रकल्पाला पाच पॅकेजमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक पॅकेजसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनी नेमली. नागरी काम आता १६ पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आले आहे .
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे. नागपूर ते शिर्डी या ७०१ किमीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून कार्यान्वित होईल. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान ५२० किमीचा आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.
शब्दांकन:-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल, उत्तर नगर जिल्हा