आश्वी खु: येथे राजहंस मेडिकल या औषधे दुकानाचे उदघाटन!

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ या संस्थेच्या राजहंस मेडिकल या फर्म चे आश्वी खुर्द येथे नुकतेच उदघाटन करण्यात आले
राजहंस मेडिकल जनावरांची औषधे या मेडिकलचे उदघाटन संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सागंळे , संघाचे संचालक आर.बी. राहणे ,, व्हा चेअरमन राजेंद्र चकोर , संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक विक्रमराव थोरात , तुकाराम दातीर , संतोष मांडेकर, सजंय पोकळे , गोरक्षनाथ नवले, राजहंस मेडिकलचे संचालक प्रतिक सांगळे यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी ,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, , संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक तसेच संघाचे , कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी तसेच सर्व विभागप्रमुख , आश्वी खु. परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
