वाघापूर येथे प्रजासत्ताक दिन साजरा!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुकतातील वाघापूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला
गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येत शाळेच्या विकासाठी विविध उपक्रम राबण्याची मोहीम यावेळी हाती घेतली
वाघापूर जि प शाळेत इ 1 ली ते 8 वी चे वर्ग असून सध्याचा शाळेचा पट 150 असा आहे मुलाच्या भौतिक सुविधा तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेसाठी 2 हेक्टर 40 आर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला तसेच खासदार निधी उपलब्ध करून त्यातून शाळेला तार कंपाऊड करण्याचे हाती घेण्यात आले तसेच नवीन ग्रामपंचायत कमेटी व सरपंच सौ सीमा लांडे व उपसरपंच सौ रोहिणी औटी याच्या सहकार्यातून शाळेसाठी गेट व शालेय कमान व शालेय मैदानावर ओटे बांधण्यात आले
तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून 2 वर्ग खोल्याची दुरुस्तीस मंजुरी मिळाली आहे व ग्रामपंचायत निधी 15 वित्त आयोगातून 1 वर्ग खोली दुरुस्तीस घेण्यात आली या विकास कामांची सुरवात प्रजासत्ताक दिनी करण्यात आली
