धामणगाव पाट येथे कांदा पीक चर्चासत्राचे आयोजन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे कांदा पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक 16/ 12/ 2022 रोजी सायंकाळी सात वाजता हनुमान मंदिर धामणगाव पाट येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे
सिजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे यावेळी सिजेंटा कंपनीचे डिव्हिजनल मार्केटिंग लीड सुनील गायकवाड, प्रोजेक्ट कैलास शेळके ,बिझनेस मॅनेजर पुणे सुभाष ठाकूर हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत
कीड व रोग ,एकात्मिक व्यवस्थापन, बदलता हवामानाचा पिकांवरील परिणाम ,प्रभावी तन नियंत्रण, एकरी उत्पादकता, सुधार नियोजन ,अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे तरी सदर चर्चासत्रात शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन टेरिटर मॅनेजर संदीप खाडे, विनोद थुट्टे संकेत दिवटे यांनी केले आहे
——–
