इतर
राजापूर महाविद्यालयाचा सत्यम इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्स अँड मॅनेजमेंट बरोबर सामंजस्य करार…

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सत्यम इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्स अँड मॅनेजमेंट नवी मुंबई या संस्थेबरोबर सामंजस्य करार झाला
आज दि 13 जून 2022 रोजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग व महाविद्यालयीन सामंजस्य करार समन्वयक प्रा. सुभाष वर्पे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संतोष गोर्डे यांच्या उपस्थितीमध्ये हा करार झाला.
सदर करारानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित कोर्सेस करण्यासाठी सुवर्णसंधी या माध्यमातून मिळणार आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिल गोडसे संचालक भानुदास सोनवणे ,उपाध्यक्ष आर.पी.हासे उपस्थित होते.