आत्मविश्वास निर्माण करणारा व्यक्ती यशस्वी होतो-अॅड.मनोहरराव देशमुख.

सत्यनिकेतन संस्था राजूर आयोजित गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ संपन्न.
अकोले /प्रतिनिधी-
व्यक्तिमत्वात सखोलता आणि विचारात शुद्घता असेल तरच तो महान बनतो.वास्तविक जीवन हेच मुळात परिश्रमाचे आहे.त्यासाठी जीवनात आत्मविश्वास महत्वाचा आहे.कारण आत्मविश्वास निर्माण करणारा व्यक्ती यशस्वी होतो. असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख यांनी केले.
अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्था अंतर्गत असलेल्या राजूर,खिरविरे,कातळापुर,शेणित येथील इयत्ता १०वी व १२वी मधील बोर्ड परीक्षेत प्रथम तिन क्रमांक प्राप्त केलेल्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी अॅड.मनोहरराव देशमुख विचारमंचावरून बोलत होते.
यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंद उमराणी,मारूती मुठे,अशोक मिस्त्री,चिमणराव देशमुख, श्रीराम पन्हाळे,एस.टी.एलमामे, राम काठे,विजय पवार, प्रकाश महाले, नंदकिशोर बेल्हेकर, एम.के. बारेकर, प्राचार्य डॉ.बी.वाय.देशमुख, मनोहर लेंडे,लहानु पर्बत, शिवाजी नरसाळे,बादशहा ताजणे, संजय शिंदे, शामराव साबळे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना अॅड. देशमुख यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडा. न्युनगंड दुर करा. टर्निंग पॉईंडला भविष्याचा विचार करा. त्यावर यश अवलंबुन असते. जिवनाचा मार्ग निश्चित करा.त्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन,संस्कार महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
सचिव टि.एन.कानवडे यांनी विदयार्थ्यांची प्रगती महत्वाची मानुन मार्गदर्शन करा. त्यावरच सत्यनिकेतन परीवाराचे यश अवलंबुन असल्याचे विचार व्यक्त करुन प्रत्येक वर्षी विदयालयांचा निकाल शंभर टक्के लागला तर सत्काराचा योग संस्थेला यावा हि सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी एस.टी.एलमामे यांनी व्यक्तीमत्वाचा विकास करून चांगला माणुस म्हणुन जगता आले पाहीजे असे मत व्यक्त केले.यावेळी शेणित येथील डॉ.राजेंद्र प्रसाद आश्रमशाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याने मुख्याध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कुस्तीमध्ये झारखंड येथे ब्रास पदक मिळविल्यामुळे कुस्तीपट्टू पल्लवी खेडकर तसेच कोच तान्हाजी नरके यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ.बी.वाय.देशमुख यांनी केले. तर प्रास्ताविक मिलिंदशेठ उमराणी यांनी केले. सुत्रसंचलन संतराम बारवकर यांनी केले तर श्रीराम पन्हाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.वाल्मीक गिते,प्रा.सुखदेव थोरात,डॉ.एल.बी.काकडे, विलास लांघी, शाम पवार आदींनी परीश्रम घेतले.
