राजुर येथे सावित्रीबाई मदन तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धा सपन्न

राजूर:प्रतिनिधी
येथील सत्यनिकेतन संस्थेने आयोजित केलेल्या श्रीमती सावित्रीबाई मदन अकोले तालुकास्तरीय शालेय मॅरेथॉन स्पर्धेचा मुलांच्या गटातील फिरता चषक मवेशी येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाने तर मुलींच्या गटात लिंगदेव येथील न्यू इंग्लिश स्कुलने पटकाविला.
सत्यनिकेतन संस्थेच्या संस्थापक कोषाध्यक्षा सावित्रीबाई मदन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेने तीन किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत तालुक्यातील २१ माध्यमिक विद्यालयांतील ९० मुले आणि ८० मुली असे एकूण१७७ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संचालक मिलिंद उमराणी यांनी सावित्रीबाई मदन यांच्या कार्याचा आढावा घेतला तर राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत धावपटूंना हिरवा झेंडा दाखविला.

संस्थेचे संचालक एस टी एलमामे आणि उमराणी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी धावपटूंना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.यावेळी संचालक राम पन्हाळे, विजय पवार,प्राचार्य डॉ बी वाय देशमुख, प्राचार्य मनोहर लेंडे,उपप्राचार्य बी एन ताजणे,प्राचार्य एल पी परबत,मुख्याध्यापक शिवाजी नरसाळे,शाम साबळे,संजय शिंदे, व विविध विद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते.अध्यापक दीपक पाचपुते आणि संतराम बारवकर यांनी सूत्रसंचालन केले.क्रीडाशिक्षक भाऊसाहेब बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर, खिरविरे,कातळापूर,शेणीत येथील शिक्षकांनी व एन सी सी छात्र यांनी स्पर्धेचे योग्य नियोजन केल्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेत यश संपादन केलेले विद्यार्थी धावपटू पुढील प्रमाणे.कंसात विद्यालय ,मुलांच्या गटात प्रथम क्रमांक समीर विष्णू भांगरे(समर्थ माध्यमिक विद्यालय मवेशी),द्वितीय व तृतीय अनुक्रमे मंथन तुकाराम डगळे व ओमकार पंढरीनाथ पोटे(सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे) चतुर्थ समीर नामदेव खाडगीर (मधुकरराव पिचड विद्यालय राजूर)तर पाचवा स्वराज बाळासाहेब भांगरे (गुरुवर्य.रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर) मुलींच्या गटात प्रथम आणि द्वितीय साक्षी संदीप हाडवळे व धनश्री दत्तू होलगीर (न्यू.हायस्कूल व जुनिअर कॉ.लिंगदेव)तिसरा क्रमांक पूजा भाऊसाहेब आवारी(सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे) ,चवथा प्रतीक्षा आनंदा नाडेकर(मधुकरराव पिचड विद्यालय पाडोशी)तर पाचव्या स्थानी सृष्टी शरद सदगीर (श्री समर्थ माध्यमिक विद्यालय मवेशी)तर आभार मुख्यध्यपक मनोहर लेंडे यांनी मांडले
