कोकणवाडी (अकोले ) दि 24 – ए एस के फाउंडेशन आणि बायफ च्या पुढाकाराने अकोले तालुक्यातील आदिवासी भागात स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड होत आहे आदिवासी भागात स्ट्रॉबेरी सारख्या पिकाची लागवड होत असल्याच्या आनंदात आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी रोपाची पूजन करून दिवाळी साजरी केली
सौ. सीमा व श्री मधुकर पटेकर या या दाम्पत्यांनी स्ट्रॉबेरी रोपाची पूजन करून आपली दिवाळी साजरी केली
ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक मार्फत समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत 10 गावांमध्ये स्ट्रॉबेरी ची रोपे देण्यात आली. रणद खुर्द, रनद बुद्रुक, गुहिरे, भंडारदरा, बारी, जहागीरदारवाडी, पेंडशेत, पांजरे येथे स्ट्रॉबेरी ची 57 शेतकऱ्यांना रोपे देण्यात आली.ऐन दिवाळी सणात लागवडीची तयारी सुरू आहे.तसेच दिवाळी मध्ये रोपे आल्यामुळे शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी रोपांचे पूजन करून लक्ष्मी पूजन साजरे केले.
स्ट्रॉबेरी हे एक चांगले उत्पन्न देणारे पीक आहे तसेच ते आपल्या घरात समृद्ध किसान प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या घरात आले आहे. त्यामुळे आमच्या घरात लक्ष्मी नांदेल व भरभराट होईल. या दृष्टीने आम्ही स्ट्रॉबेरी रोपांबरोबर लक्ष्मी पूजन साजरे केले असे मत श्री मधुकर पटेकर यांनी व त्यांचे कुटुंबांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे आणि बायफचे श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे राम कोतवाल, विष्णु चोखंडे, काजल देशमुख, मारुती सगभोर, मच्छिंद्र मुंढे, वर्षा भागडे हे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.