
अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
जि. प. प्रा. शाळा मिडसांगवी ता.पाथर्डी येथे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा उत्साहात संपन्न झाला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवी येथे शाळा पूर्व अभियान मेळावा घेण्यात आला यावेळी सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.सुंदर सजावट केलेली बैलगाडी लक्षवेधक ठरली. बैलगाडीतून इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गीत गायनाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. शाळेत नवागत विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र दालन सजवण्यात आले . तेथे शैक्षणिक व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. सात स्टॉल लावून विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक व मानसिक कल कसा आहे याची चाचपणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शत्रुघन जाधव हे होते. सरपंच भगवान हजारे, उपसरपंच विष्णू थोरात व ग्रामपंचायत सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीतानंतर बहारदार लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. मनिषा खेडकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक बाळासाहेब घोंगडे यांनी मनोगतातून सदर कार्यक्रमाचे महत्व विषद केले.
इयत्ता पहीलीच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी विविध स्टॉलला भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्यंगचित्रकार दीपक महाले आणि वाल्मिक बडे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर वाघ यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण कराड,बंकटस्वामी बडे, वाल्मीक बडे, मंजुषा कानडे , धर्मप्रसाद जोशी ,अंगणवाडी कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालकांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते ,विस्तार अधिकारी घुले मँडम,केंद्र प्रमुख महादेव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा यशस्वीपणे पार पडला.