रविवारी कोतुळेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

कोतुळ प्रतिनिधी दि 21
रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळ( ता अकोले) येथील कोतुळेश्वर विद्यालयात शिक्षण घेऊन (सन. १९७८ १० वी बॅच मधून ) बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी आयोजित केला आहे
रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ या विद्यालयातील विद्यार्थांचा स्नेह मेळावा रविवार दि २५/१२/२०२२ रोजी आयोजित केला आहे. शाळेतील जुने
विद्यार्थीं मित्र विद्यालयात एकत्र 40 वर्षांनी एकमेकांच्या भेटी गाठी साठी एकत्र येत आहे यावेळी शाळेत गुरूपूजन करण्यात येणार आहे त्यानंतर सर्व जुन्या मित्रांना उद्योजक माणिक लक्षण देशमुख यांचे फार्म हाऊस येथे एकत्रित स्नेहभोजन घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे
कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ, या विद्यालयातून सन १९७८ या वर्षात दहावी च्या वर्गातून बाहेर पडलेल्या बॅच च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भरत देशमाने, सोमनाथ लेंभे, भास्कर हांडे, भानुदास घाटकर, दिलीप कि. देशमुख, प्रदिप नेवास्कर,सुर्यकांत खोल्लम, रमेश गु. देशमुख, तान्हाजी देशमुख, शांताराम साबळे, किशोर व. देशमुख, पदमाकर महाजन, सुनिल शहा, भोर राधाकिसन, प्रकाश मा. देशमुख, सुरेखा देशपांडे, साधना पवार, यांनी केले आहे