इतर
अकोले येथील प्रभाकर मैड गुरुजी यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक प्रभाकर रघुनाथ मैड गुरुजी [वय-74.]यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली ,सून,नातवंडे असा परिवार आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा, सुगाव खुर्द,नवलेवाडी,परखतपूर, शेकईवाडी येथे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.
त्यांच्यावर अकोले येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुणे येथील एका खासगी कंपनीत कार्यरत असणारे आशिष मैड,पालघर येथील प्राथमिक शिक्षिका प्रिती बोकंद,वाडा कॉलेजच्या प्रा.रुपाली बोकंद यांचे ते वडील होत. बँक ऑफ इंडिया पुणे येथे सेवेत असणाऱ्या रोहिणी मैड यांचे ते सासरे होत.