आदिवासी भागांतील रेशनिंग धान्य पुरवठा सुरळीत करा

राजूर प्रतिनिधी
आदिवासी भागातील धान्य दुकानांमध्ये रेशनिंगचा माल वेळेत ‘पुरवठा खात्याकडून येत नसल्याने लाभार्थीना वेळेत वाटप करता येत नाही. त्यातच रेंज नियमित नसल्याने थम होत नाही. लाभार्थी उपाशीपोटी दिवस दिवस धान्यासाठी थांबतात. या भागातील लाभार्थ्यांना एप्रिल – 2022 चे अजूनही मोफत धान्य वाटप करण्यात आले नाही. तसेच आज दि. 22/12/022 रोजी धान्य दुकानात सप्टेंबर 22 चे धान्य वाटप करण्यात येत होते. तर माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर 22 चे धान्य दुकानदारांना अद्यापही पोहोचलेले नाही. याबाबत लाभार्थींनी नाराजी व्यक्त केली.
तहसीलदार सतीश थेटे व पुरवठा अधिकारी यांनी या कडे लक्ष देऊन तातडीने मोफत धान्य वाटप करण्याचे आदेश द्यावेत. जेणेकरून लाभार्थीना मोफत धान्य मिळेल अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते समाज सेवक डॉ. अनंत घाणे, भरत घाणे, सुरेश गभाले, राजू भारमल, तुकाराम खाडे, सुनील पवार भिमा अवसरकर, गोविंद दराने, मच्छिंद्र खाडे, संगीता खाडे, धोंडाबाई कर्टुले,झुंबरबाई दराने, अंकुश खाडे, सोमनाथ खाडे, लहु खाडे, अवि पवार आदिसह जहागिरदारवाडी, बारी, वारंघुशी येथील लाभार्थ्यानी केली. रेशनिंग धान्य पुरवठा सुरळीत न झाल्यास तहसील कार्यालयात आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी लाभार्थ्यांनी दिला.
यावेळी डॉ.अनंत घाणे यांनी पुरवठा अधिकारी श्री. सातपुते यांच्याशी फोन वर संपर्क साधून लाभार्थीच्या व्यथा सांगितल्या. यापुढे धान्य पुरवठा व्यवस्थित सुरळीत केला जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.