चैतन्यपूर उपोषणाचा आज तिसरा दिवस, चौकशी चौकशी साठी महावितरण कडून त्रिस्तरीय समिती नेमली!

पुष्पांताई लहामटे यांनी घेतली भेट!
कोतुळ प्रतिनिधी
वीज वितरण राजुर चे सहाय्यक अभियंता श्री विवेक मेवाड व ब्राह्मणवाडा चे कक्ष अभियंता श्री घोलप यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी चैतन्यपूर् ग्रामपंचायतचे सरपंच नितीन डुंबरे यांनी गुरुवारी( दि 22) चैतन्यपूर बसथांबा येथे आमरण उपोषण सुरू केले
उपोषणाचा आज दुसरा दिवस होता
सरपंच नितीन डुंबरे यांनी महावितरणचे राजुर चे सहायक अधिकारी विवेक मेवाड व ब्राम्हणवाडा येथील अभियंता श्री घोलप यांच्या मनमानी व गैर कारभारा ची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी केली आहे त्याबरोबरच परिसरात सुरू असलेला त्यांचा आंधाधुंद कारभारा ने शेतकरी जेरीस आले आहे हेदोन्ही अधिकरी संगनमताने लोकांकडून पैसे उकळतात या दोन्ही अधिकारी यांची विभागीय व आर्थिक गुन्हे शाखे कडून चौकशी व्हावी त्यांना तत्काळ निलंबित करावे.. या मागणी सह विजेच्या विजेच्या संदर्भातील इतर काही मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे
उपोषणाचा आज दुसरा दिवस होता या उपोषणाची दखल घेत
चौकशी साठी महावितरण कडून त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली आहे या समितीत श्री एल एम काकडे (कार्यकारी अभियंता अहमदनगर ग्रामीण विभाग), प्रमोद राजे भोसले (उपमुख्य औद्योगिक अधिकारी परिमंडळ कार्यालय नाशिक) तसेच बी एस खराटे (अतिरिक्त कार्यकारी अभियंता कोपरगाव शहर उपविभाग ) यांची नेमणूक करण्यात आली आहे
संगमनेर येथील महावितरण अधिकारी श्री अनिल थोरात यांनी आज चैतन्यपूर येथे येऊन सरपंच नितीन डुंबरे आणि निलेश गवांदे या सह ग्रामस्तांची भेट घेतली। आम दार डॉ किरण लहा मटे नागपूर येथे अधिवेशनात व्यस्त असल्याने आज त्यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई लहामटे यांनी भेट देत आंदोलन कर्त्यांची भेट घेतली