पुण्यातील मांजरी केशवनगर, वाहतूक कोंडी मुद्द्यावरून आ.चेतन तुपे विधानसभेत आक्रमक !

दत्ता ठुबे/नागपुर दि22
हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या वाहतूक कोंडी विरोधात आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. मांजरी, केशवनगर येथील प्रजिमा ५६ आणि प्रजिमा ३४ या रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गावे पुणे मनपात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. नागरी वस्तीचे प्रमाण अधिक असलेल्या या दोन्ही गावांमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मांजरी येथे नदीवरील पुल अर्धवट बांधण्यात आल्याने नागरिकांना गैरसोय सहन करावी लागते आहे. याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २५ कोटी निधी या पुलाच्या कामासाठी मंत्री महोदयांकडे प्रस्तावित आहे. मात्र अद्यापही जैसे थे स्थिती असल्याने मांजरी केशवनगर परिसरातल्या नागरिकांना वाहतूक कोंडी सहन करावी लागते आहे. अर्धवट पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आम्हाला तातडीने निधी उपलब्ध व्हावा अशी आग्रही मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे.
पुलावरून एकटा आमदार प्रवास करणार नाही तर परिसरातील नागरिक रोज ये जा करणार आहे किमान त्यांचा विचार करून तरी निधी उपलब्ध करून द्यावा अशी खोचक टीकाही त्यांनी केली.