रोटरी क्लब नाशिक तर्फे विद्यार्थांना चष्मे, सायकल वाटप!

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कम्युनिटी सर्व्हिस मेडिकल आणि कम्युनिटी सर्व्हिस नॉन मेडिकलच्या वतीने उज्वलदृष्टी अभियानांतर्गत शहरातील व्यंकटराव हिरे महाविद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले.
सायंकाळी दह्याचीवाडी येथे नऊ गरजू विद्यार्थिनींना शाळेत जण्यायेण्यासाठी सायकलिंगचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. आदिवासी भागातील मुलींना शिक्षणासाठी पायपीट करीत जावे लागत असल्याने विद्यार्थिनींना सायकली देण्यात आल्या.

रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडीया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या या दोन्ही उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. सायकल वाटप केल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.
रोटरीचे सचिव ओमप्रकाश रावत, कम्युनिटी सर्व्हिस मेडिकलचे संचालक प्रणव गाडगीळ, कम्युनिटी सर्व्हिस नॉन मेडिकलचे संचालक हेमराज राजपूत, उपाध्यक्ष शशीकांत पारख, नितीन ब्रह्मा, उर्मी दिनाणी, हेतल शहा तुषार उगले, शामकांत पाटील, सुधीर वाघ आदींचे सहकार्य लाभले.