आमदार डॉ किरण लहामटे यांनी घेतली भेट!महावितरण च्या त्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय उपोषण मागे नाही सरपंच नितीन डुंबरे

चैतन्यपूर उपोषणाचा आज तिसरा दिवस,
आमदार डॉ किरण लहामटे यांनी घेतली भेट!
महावितरण च्या त्या अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय उपोषण मागे नाही सरपंच नितीन डुंबरे
कोतुळ प्रतिनिधी
वीज वितरण राजुर चे सहाय्यक अभियंता श्री विवेक मेवाड व ब्राह्मणवाडा चे कक्ष अभियंता श्री घोलप यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी व त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी चैतन्यपूर् ग्रामपंचायतचे सरपंच नितीन डुंबरे यांनी गुरुवारी( दि 22) चैतन्यपूर बसथांबा येथे आमरण उपोषण सुरू केले उपोषणाचा आज तिसरा दिवस होता
सरपंच नितीन डुंबरे यांनी महावितरणचे राजुर चे सहायक अधिकारी विवेक मेवाड व ब्राम्हणवाडा येथील अभियंता श्री घोलप यांच्या मनमानी व गैर कारभारा ची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी केली आहे त्याबरोबरच परिसरात सुरू असलेला त्यांचा आंधाधुंद कारभारा ने शेतकरी जेरीस आले आहे हेदोन्ही अधिकरी संगनमताने लोकांकडून पैसे उकळतात या दोन्ही अधिकारी यांची विभागीय व आर्थिक गुन्हे शाखे कडून चौकशी व्हावी त्यांना तत्काळ निलंबित करावे.. या मागणी सह विजेच्या विजेच्या संदर्भातील इतर काही मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे
उपोषणाचा आज तिसरा दिवस होता या उपोषणाची दखल घेत आज अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामते यांनी भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यांनी याबाबत मंत्र्यांकडे हा विषय मांडला आहे जिल्हा नियोजन च्या बैठकीतही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे अधिकाऱ्यांनी काम करताना विलंब होऊ शकतो मात्र अधिकारी हे जनतेचे नोकर असतात जनतेला सन्मानाची वागणूक प्रत्येक अधिकाऱ्याने दिलीच पाहिजे असे आमदार डॉक्टर लहामटे यांनी यावेळी सांगितले