फातिमाबी शेख साहित्य संमेलनाध्यक्षपदी अनिसा सिकंदर शेख. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचा पुढाकार

पुणे प्रतिनिधि:-
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा, ता. कळमनुरीच्यावतीने जानेवारी २०२३ पासून दरवर्षी पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त साहित्य संमेलन घेण्याचे केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठरले.
फातिमाबी शेख ह्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका आहेत. त्या सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीण होत्या. पुणे ही त्यांची जन्मभूमी आहे व ९ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन आहे.या जयंतीचे औचित्य साधून पहिले फातिमाबी शेख साहित्य संमेलन पुणे येथे व्हावे ही महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांची इच्छा असल्यामुळे पुणे येथे ८ जानेवारी २०२३ रविवार रोजी संमेलन घेण्याचे ठरले. या पहिल्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवयित्री अनिसा सिकंदर शेख, पुणे यांची निवड करण्यात आली. तर स्वागताध्यक्षपदी सुप्रसिद्ध गजलकार बा. ह. मगदूम, पुणे हे राहणार आहेत. उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक डाॅ. सय्यद जब्बार पटेल यांच्या शुभहस्ते होणार आहे. या एकदिवसीय साहित्यसंमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, स्मरणिका प्रकाशन, पुरस्कार वितरण, भव्य कविसंमेलन आदि कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष बा.ह.मगदूम , उपाध्यक्ष शौकत दस्तगीर मुलाणी ,सचिव दत्तु भिमा ठोकळे ,सहसचिव अॅड.सौ.जयश्री आर.बोडेकर , कोषाध्यक्ष सलीम अ. रहमान शेख , कार्याध्यक्ष फराश, सुलतान मकबूलभाई शेख ,अमर गफूर शेख , सौ. ए. बी. काझी व केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष अॅड. हाशमपटेल, उपाध्यक्ष खाजाभाई बागवान, कार्याध्यक्ष प्रा. महंमद रफी शेख, संस्थापक शेख शफी बोल्डेकर, विश्वस्त इस्माईल शेख, जाफरसाहाब शेख, महासेन प्रधान यांनी केले आहे.