सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही -विवेकजी मदन.
अकोले/प्रतिनिधी-
शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो.संघर्ष केल्याशिवाय रत्न उजाळत नाही,त्याचप्रमाणे सातत्याने संघर्ष केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष विवेकजी मदन यांनी केले.
अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी विवेकजी मदन अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे ,संस्थेचे संचालक व माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर,विभागीय अधिकारी प्रकाश महाले,शालेय समितीचे सदस्य दिनेश शहा,केंद्रप्रमुख विजय भांगरे,सरपंच गणपत डगळे,उपसरपंच सुभाष बेणके,सदस्या गौतमी पराड, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य त्रिंबक पराड,व्हा.चेअरमन प्रविण पराड,राणु बेणके,भास्कर बेणके,राम कोतवाल, शुभम नवले, प्राचार्य लहानु पर्बत यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ तसेच विदयार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक मदन यांनी यावेळी बोलताना सांगितले की स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा.काहीही करा पण गुणवत्तपुर्ण करा.ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिवओता. त्यात सर्वोच्चस्थानी पोहचा,स्वतःचा आत्मविश्वास वाढवा असेही विचार व्यक्त करून शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जितीनजी साठे यांनी कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नाही.सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कधीच अपयश येत नाही.जिवनात जिद्द,संयम,प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कायम राहाते.हि शाळा, गाव माझे असून या मातीत विशिष्ट गोडवा आहे. शाळा हाच विकासाचा केंद्रबिंदु असून शिक्षक प्राणओतून काम करतात त्यामुळे गुणवत्ता निर्माण झाल्याने प्रचंड आनंद निर्माण झाला असल्याचे विचार प्रतिपादीत केले.
यावेळी कला तसेच क्रिडा क्षेत्रात नैपुण्य संपादन केलेल्या विदयार्थ्यांना शालेय उपयोगि साहित्य, मेडल प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य लहानु पर्बत यांनी केले.सांस्कृतीक कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन लगड व भरत भदाने यांनी केले तर पारितोषीक वितरणाचे सुत्रसंचलन कविता वाळुंज यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य लहानु पर्बत,लिपिक भास्कर सदगिर,जेष्ठ शिक्षक संपत धुमाळ,कविता वाळुंज,प्रविण मालुंजकर,भरत भदाने, नानासाहेब शिंदे,धनंजय लहामगे,भाऊसाहेब कोते, विक्रम आंबरे,रामदास डगळे,सचिन लगड,संगिता भांगरे,वनिता बेंडकोळी, प्रकाश भांगरे,सौरभ मोहटे, श्री.बगाड,पि.के.बेणके, सुनिल देशमुख तसेच विदयार्थी आदींनी परिश्रम घेतले.शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.