इतर

आजचे पंचांग राशिभविष्य दि.१७/०७/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २६ शके १९४६
दिनांक :- १७/०७/२०२४,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०७,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकदशी समाप्ति २१:०३,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति २७:१३,
योग :- शुभ समाप्ति ०७:०४,
करण :- वणिज समाप्ति ०८:५५,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुनर्वसु,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- करिदिन वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३५ ते ०२:१३ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:०३ ते ०७:४१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४१ ते ०९:१९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२९ ते ०७:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
शयनी एकादशी, करिदिन, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, मोहरम, अमृत २७:१३ प., घबाड २१:०३ नं. २७:१३ प., भद्रा ०८:५५ नं. २१:०३ प.,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २६ शके १९४६
दिनांक = १७/०७/२०२४
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची नाहक चिंता कराल. मित्र परिवाराची उणीव जाणवेल. मनावर कसलाही ताण घेऊ नका. स्व‍च्छंदी विचार करावेत.

वृषभ
नवनवीन गोष्टी वाचनात येतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. जोडीदाराविषयी मनात संभ्रम निर्माण होईल. अपचनाचे विकार जाणवू शकतात. विवेकाने परिस्थिती हाताळावी.

मिथुन
पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल. प्रेमातील व्यक्तीसाठी उत्तम दिवस. आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल.

कर्क
घरात कटू शब्द वापरू नका. शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात. दिवस मध्यम फलदायी राहील. नसते साहस करायला जाऊ नका.

सिंह
परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. संमिश्र घटना जाणवतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. ध्यानधारणा करावी.

कन्या
तरुणांनी बेफिकिरीने वागू नये. सामाजिक बांधीलकी जपावी. काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. लाभाच्या संधीकडे लक्ष ठेवावे.

तूळ
कौटुंबिक वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका. कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. भावंडांशी वादाचे प्रसंग टाळा.

वृश्चिक
मनात एक अनामिक भीती राहील. परंतु फार काळजी करण्याचे कारण नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल. एकांत हवाहवासा वाटेल.

धनू
महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल. विरोधक नरमाईने घेतील. मनातील काळजी दूर सारावी लागेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे. मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल.

मकर
विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. घरात उगाचच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडा काळ लागेल. चिकाटी सोडून चालणार नाही.

कुंभ
कामात स्थिरता ठेवावी. अधिक उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. समोरील कामे प्राधान्याने करावीत. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

मीन
खाण्या-पिण्याच्या सवयी बाबत आग्रही राहाल. आवडते छंद जोपासावेत. नकारात्मक विचार टाळावेत. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button