दिशा महिला मंचने साजरा केला अनोखा तुळशी पूजन दिवस

दत्ता ठुबे
मुंबई – 25 डिसेंबर रोजी तुळशी पूजा दिवस दिशा महिला मंच व्यासपीठाने कामोठे येथे साजरा केला
सेक्टर 36 मधील संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर येथे रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण केंद्र,पुणे यांच्या सहकार्याने कामोठे येथे सुरु असलेल्या शिवकालीन शस्रकला प्रशिक्षणार्थी सोबत मोठ्या उत्साहात साजरा केला.
हिंदू धर्मात तुळस पूजनिय मानली जाते. तुळस ही केवळ वनस्पती नाही तर पृथ्वीसाठी वरदान आहे. आयुर्वेदात तुळशीला अमृत म्हटले जाते. 25 डिसेंबर रोजी तुळशीचे पूजन केले जाते.हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा जपण्याच कार्य दिशा व्यासपीठ व रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत कामोठे येथे झाले.
यावेळी श्री.ह.भ. प. निवृत्ती महाराज धुमाळ यांच्या हस्ते तुळशीचे पूजन करण्यात आले तसेच उपस्थित असलेल्या महिलांनीही यावेळी तुळशीची पूजा केली. यावेळी उपस्थित श्री.ह.भ.प. अशोक महाराज पवार यांनी हिंदू धर्मातील तुळशी पूजेचे हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्व सांगितले. उपस्थित मान्यवर श्री.ह.भ.प. निवृत्ती महाराज धुमाळ यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना शुभाशीर्वाद देत उपक्रमाचे कौतुक केले. श्री.ह.भ. प.गोरख महाराज घाडगे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
हिंदू धर्मातील संस्कृती,रूढी,परंपरा जपण्याच काम नेहमीच दिशा व्यासपीठामार्फत केल जात व पुढेही केल जाईल असं दिशा व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यावेळी म्हणाल्या. क्रिसमस ची धूम धाम चालू असताना हिंदू धर्माची संस्कृती जपण्याच व रूजवन्याच कार्य कामोठे परिसरात दिशा व्यासपीठाच्या माध्यमातून झालं, याच मनोमन समाधान आहे असे संस्थेच्या संस्थापक सौ.निलम आंधळे यांनी व्यक्त केला.
यावेळी सदस्य दीपा खरात, गीता कुडाळकर तसेच कामोठ्यातील इतर मान्यवर जयश्री झा, मनीषा नीलकंठ, रेश्मा घाडगे, दशरथ पाटील व शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते.
