उत्पादन शुल्क च्या छाप्यात 17 हजाराची दारू जप्त
अकोले राजूर अवैध दारू विक्री चालूच
अकोले प्रतिनिधी
शासनाने राजूर गावात दारूबंदी केली असताना ही राजूर गावात खुलेआम दारू विक्री सुरू आहे हे आता सिद्ध झाले आहे। स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने ही दारू विक्री सुरू असल्याचे आता उघड झाले आहे
श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकत १७ हजार ५२० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त
खबरीवरून रविवारी केळुंगण शिवारातील हॉटेल हिरा, इंदोरी फाटा येथील हॉटेल सह्याद्री व राजूर
येथे पाच ठिकाणी छापा टाकून १७ हजार ५२० रुपयांची अवैध देशी दारू जप्त केली आहे.
याप्रकरणी राजूर येथील आनंदा अंकुश देशमुख,
विक्रम अशोक घाटकर, दीपक बाळू पोलादे, अमोल सूर्यकांत कानकाटे, संजय अदालतनाथ शुक्ला, नवनाथ सुरेश देशमुख, सचिन सुदाम जाधव, भाऊसाहेब बाळाजी शिंदे यांच्यावर
मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हॉटेल सह्याद्रीचा मालक दशरथ
अप्पा नवले याला फरार घोषित केले आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाळ चांदेकर, दुय्यय निरीक्षक एस. बी. शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक दुय्यम निरीक्षक टी. आर. शेख, महिला जवान एस. आर. फटांगरे
यांनी ही कारवाई केली.