इतर

शारीरिक बदलांविषयी सतर्कता आवश्यक – डॉ. नागेश मदनुरकर

नाशिक : जगभरात कॅन्सर विषयक रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेळोवेळी शारीरिक तपासणी करत राहिल्यास हा आजार त्याच्या प्राथमिक अवस्थेतच माहिती पडू शकतो व त्याची योग्य चिकित्सा केल्यास तो पूर्णतः बरा होऊ शकतो. प्रत्येक नागरिकांनी आपल्या शरीरात होणाऱ्या शारीरिक बदलांविषयी सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून कुठल्याही रोगाविषयी माहिती प्राथमिक अवस्थेतच प्राप्त होऊ शकते. यासंबंधी वेळीच सावधगिरी बाळगल्यास हा आजार आटोक्यात  येईल असे मत प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नागेश मदनुरकर यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे ‘कर्करोगाचे पूर्वलक्षी निदान आणि प्रतिबंध’ या दुर्धर आजाराविषयी विशेष व्याखानाचे संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे प्रभारी अध्यक्ष तथा सचिव ओमप्रकाश रावत, प्रभारी सचिव डॉ. गौरव सामनेरकर, कम्युनिटी सर्व्हिसचे मेडिकल डायरेक्टर प्रणव गाडगीळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना कॅन्सर तज्ज्ञ डॉ. नागेश मदनुरकर यांनी स्लाईड शोद्वारे कॅन्सरच्या विविध प्रकारांविषयी माहिती दिली. मांसाहार, धुम्रपान आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो आणि जगभरात त्याचे प्रमाण खूप कमी होऊ शकते. औद्योगिक प्रदूषण व रासायनिक कीटक नाशकांच्या अतिवापरामुळेसुद्धा कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रोटरी क्लबचे प्रभारी अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनी रोटरीच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. प्रभारी सचिव डॉ. गौरव सामनेरकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंथ लिडर डॉ. हितेश बुरड आदींनी परिश्रम घेतले. व्याख्यानास नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button