पारनेर येथील क्रीडा संकुलमधे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

दत्ता ठुबे
पारनेर :-भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र अहिल्यानगर व जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांच्या मार्गदर्शनाने पारनेर येथील क्रीडा संकुल येथे तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धा सम्पन्न झाल्या. यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवक युवती सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेमधे 100 मीटर धावणे. (मुले आणि मुली ), गोळा फेक (मुले आणि मुली ),खो खो. मुली इ. स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेमध्ये 100 मी.मुलांमध्ये अनुक्रमे गणेश पवार,सुजित बोरुडे,शहाजी चत्तर यांनी बक्षीस मिळविले.१०० मी. मुलीमध्ये वैष्णवी चौधरी,प्रतिक्षा घोलप,मोनिका पोटे यांनी बक्षीस मिळविले तर गोळा फेक मुलांमध्ये अनुक्रमे वैष्णव चौधरी,प्रशांत महांडुळे,दत्तात्रय लोंढे यांनी बक्षीस मिळविले.मुलिंमध्ये प्रतिक्षा घोलप,ऋतुजा सूर्यवंशी पुजा सोंडकर,वैष्णवी चौधरी यांची अनुक्रमे जिल्हा पातळीवर निवड झाली.

यावेळी पंच म्हणुन माजी सैनिक दिवटे मेजर व शिर्के मेजर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी रवी ठाणगे,आदेश कावरे,सुमित गायकवाड़,वैष्णव चौधरी,गणेश पवार,राहुल चौगुले, नितिन फाड़,सिद्धार्थ कळसकर,भावेश रेपाळे,शहाजी चत्तरसह हार्दिक रेपाळे सहभागी झाले होते.