आंतरराष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद
भारतीय भारतीय संघाचे सुयश

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
भारतीय संघातील पुण्यनगरीतील तायक्वांदो खेळाडू शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथील निकम परिवारातील असणारे प्रणव दत्तात्रय निकम यांने आंतरराष्ट्रीय खेळाडूस नामोहरम करीत भारतीय संघाकरीता सुवर्णपदक मिळवून दिले
.प्रणव निकम हा पिंपरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार दत्तात्रय निकम यांचा मुलगा आहे. दत्तात्रय निकम हे देखील कबड्डी व ॲथलेटीक्सचे खेळाडू आहेत. या यशाबद्दल प्रणव चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रणव हा रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील शाळेचा विद्यार्थी आहे. साधना इंग्लीश मेडीयम शाळेच्या वतीने शालेय स्तरावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली होती. या यशात रयत शिक्षण संस्थेच्या साधना शिक्षण संकुलाचे मुख्याध्यापक, शिक्षक, खेळ शिक्षक कु. पौर्णिमा मेमाणे यांनी अथक मेहनत घेतली. प्रणव हा चाॕम्पियन्स मार्शल आर्टस् अॕकेडमी हडपसर येथे शिहान प्रदीप वाघोले, तेजस वाघोले व ललीत वाघोले यांच्याकडे तायक्वांदो व कराटेचे धडे घेत आहे.या यशाबद्दल ढोरसडा ग्रामस्थांच्या वतीने कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.