देशविदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं आज पहाटे वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी 18 जून रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

मातोश्री हिराबेन यांचेवर अहमदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे बंधू पंकज मोदी यांनी मातोश्री हिराबाई यांना खांदा दिला