COVID-19 आता जागतिक आणीबाणी नाही, WHO ची घोषणा

दत्ता ठुबे
जागतिक आरोग्य संघटनेने आज एक मोठी घोषणा करून जगभरातील लोकांना आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना ही आता जागतिक महामारी राहिलेली नाही. असे डब्ल्यूएचओने जाहीर केले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी जागतिक आरोग्य समस्यांवर मीडियाला संबोधित करताना ही घोषणा केली. ही घोषणा केली असली तरी याचा अर्थ कोरोना संपला असा अजिबात होत नाही, असे ते म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले की कोरोना यापुढे जागतिक आरोग्य आणीबाणीसाठी राहिला नाही. त्यामुळे हा कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीचा प्रतिकात्मक अंत आहे. तीन वर्षांपूर्वी 30 जानेवारी 2020 रोजी कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यात आले होते. या महामारीमुळे एकेकाळी जगातील विविध देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, ज्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर झाला होता. तसेच कोरोनामुळे जगभरात किमान 7 दशलक्ष लोक मरण पावले.